एमएचटी - सीईटी २०२० चे संभाव्य वेळापत्रक जाहीर

  • Dec 13,2019

राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार इंजिनीरिंग आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी - सीईटी प्रवेश परीक्षा १३ ते २३ एप्रिल, २०२० दरम्यान होणार आहे. 

Related : MHT-CET 2020: Experts’ Recommended Tips and Tricks

विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या ८ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या ६ अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाही पर्सेंटाइल पद्धतीने निकाल  घोषित करण्यात येणार असून, त्यासाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येईल.

सीईटी सेलने तीन व पाच वर्षीय विधि (ला), बीई/बीटेक, फार्मासी, एमबीए, आर्किटेक्चर, होटल मैनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/बीएस्सी बीएड इटिग्रेटेड या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

Related : MHT-CET 2019 परीक्षेसाठी कसा सराव कराल ?

या परीक्षांसाठी कोणत्या तारखेला अर्ज करायचा याबद्दलची माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वेळापत्रकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PCM आणि PCB गटाच्या परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल दरम्यानच्या काळात होतील, असे सीईटी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

Maharashtra CET Tentative 2020-21 Exam Schedule - Direct Link

Which Halogen reacts with caustic soda to liberate oxygen ?

For more information regarding how to prepare for JEE, NEET, MHT-CET Exams, kindly fill in your details in the following form.Default Image
Profile Image
© 2020 All rights reserved by AKP Learning Solutions Pvt Ltd