JEE परीक्षेची तयारी कशी कराल?

  • Mar 13,2019

अभियांत्रिकी (Engineering) विद्याशाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने JEE Mains आणि JEE Advanced या परीक्षांचे असलेले महत्त्व अधोरेखित करतानाच या परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षेच्या तयारीविषयक मार्गदर्शन करणारा लेख

JEE (Joint Entrance Examination) परीक्षा दोन टप्प्यात होते - JEE Mains आणि JEE Advanced. IITs, NITs आणि विविध राज्यांतील सरकारी तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रम यांचे अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश (उदा. VJTI, MIT, VIT, ICT इत्यादी.) हे  JEE Mains च्या परीक्षेतील गुणांवर होतात. देशस्तरावर सुमारे १० लाख विद्यार्थी JEE Mains परीक्षेला बसतात. त्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी हे JEE Advanced परीक्षा देण्यासाठी निवडले जातात.

Related : JEE Main 2020: Last Month Preparation Tips

JEE Mains आणि JEE Advanced  या दोन्हीही परीक्षा बहुपर्यायी (Multiple Choice Questions) आणि चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येणे (Negative Marking) अशा पद्धतीच्या असतात. JEE Mains चा पॅटर्न हा ९० प्रश्न, ३६० गुण आणि तीन तासांचा असा ठरलेला असतो. JEE Advanced चा पॅटर्न हा परीक्षेपूर्वी उघड केला जात नाही आणि दरवर्षी त्यात बदल होत असतात. JEE Advanced मधील प्रश्नांची काठिण्यपातळी ही JEE-Mains च्या तुलनेत अर्थातच अधिक असते. JEE Mains मधून JEE Advanced परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठीचा ‘कट ऑफ स्कोअर’ हा गेली तीन वर्षे ३६० गुणांपकी १०५-११५ गुण असा राहिला आहे.

महाराष्ट्रातील सुमारे ४ लाख विद्यार्थी दरवर्षी अभियांत्रिकीच्या MHT-CET प्रवेश परीक्षेला बसतात आणि सुमारे १ लाख विद्यार्थी JEE परीक्षा देतात. पण यातील JEE परीक्षेची जाणीवपूर्वक तयारी करणारे फार कमी असतात. त्याउलट आंध्र प्रदेश, दिल्ली आणि कोटामधील विद्यार्थी JEEच्या तयारीत व्यग्र असतात. असे असूनही आयआयटीत सर्वाधिक विद्यार्थी धाडणारे आंध्र प्रदेश आणि राजस्थाननंतर महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरते. म्हणूनच केवळ MHT-CETची तयारी करण्याऐवजी अभियांत्रिकीपूर्व अभ्यासाचा पाया पक्का करणाऱ्या JEEच्या नियोजनबद्ध अभ्यासाबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

Related : JEE Main 2020 Revision Tips for the Last Month

JEE परीक्षेची तयारी कधीपासून करावी?

JEE ची तयारी अकरावी-बारावी या दोन वर्षांच्या कालावधीत करता येईल. मात्र JEE अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न सोडविण्याची क्षमता दोन वर्षांत प्राप्त करणे हा बहुतेक विद्यार्थ्यांसाठी तणावपूर्ण अनुभव असतो. म्हणून JEE तयारीसाठी आठवी ते दहावीपासून तयारी करायला सुरुवात केली तर अकरावी-बारावीला JEEच्या तयारीचा ताण येत नाही. आयआयटी फाऊंडेशनच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांने आठवी अथवा नववीच्या काळात किमान एक वर्ष तरी गुंतवणूक केली तर तो विद्यार्थी शालेय स्तरावर अनुसरल्या जाणाऱ्या ‘रट्टा मार’ या अभ्यासपद्धतीतून बाहेर येईल शिवाय गणित आणि विज्ञान या विषयांच्या मूलभूत संकल्पनांबाबत त्यांची समज वाढेल. याची अतिशय मदत मुलांना अकरावी-बारावीच्या वर्षांत होत. नियोजनबद्ध अभ्यास केल्यास अकरावी पासून देखील JEE चा अभ्यास करता येऊ शकतो.    

JEE परीक्षेची अभ्यासपद्धती कशी असावी?

अकरावी-बारावीच्या पहिल्या १६ महिन्यांत, विद्यार्थ्यांने JEE च्या अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना समजून घेण्यावर भर द्यावा आणि त्या संकल्पना वेगवेगळ्या परिस्थितीत लागू करून त्यावर आधारित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. विद्यार्थ्यांनी JEE Advanced च्या काठिण्यपातळीचे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा, असे केल्याने विद्यार्थ्यांला JEE Mains चे प्रश्न आपोआप सोडवता येतील. शेवटचे सहा ते आठ महिने JEE परीक्षेच्या वेगवेगळ्या सराव प्रश्नपत्रिका सोडवून यातील प्रत्येक चाचणीतील आपल्या कामगिरीचे विश्लेषण करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांने JEE परीक्षेत यश मिळवण्यासाठी शेवटच्या सहा महिन्यांत स्वत:चा असा व्यक्तिगत परीक्षेचा आराखडा बनवावा. JEE परीक्षा Computer Based Test असल्याने ऑनलाईन सराव चाचण्या सोडवण्याचा सराव फार मोलाचा ठरू शकतो. 

Related : JEE Mains 2020 - Last Week Tips and Strategies

JEE परीक्षेच्या अभ्यासाचे स्रोत

विद्यार्थी JEEची तयारी प्रामुख्याने तीन स्रोतांद्वारे करू शकतात-

* शिकवणी वर्ग – विद्यार्थ्यांच्या शंकांचे लगेचच निरसन करणारे बुद्धिमान शिक्षक ज्या शिकवणी वर्गामध्ये असतात, जिथे अध्ययनाचा योग्य दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो आणि ज्या ठिकाणी अभ्यासाच्या वातावरणनिर्मितीसाठी उत्तम सहाध्यायी असतात, अशा शिकवणी वर्गाची मदत JEEच्या तयारीसाठी होऊ शकेल. मात्र अशा शिकवणी वर्गाचे शुल्क प्रचंड असते आणि महाराष्ट्रात JEE परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील मिळून काही दर्जेदार संस्था आहेत.

* अभ्याससाहित्याद्वारे शिकवणी- ज्या विद्यार्थ्यांचा JEE परीक्षा गांभीर्यपूर्वक देण्याचा निश्चय पक्का आहे आणि जो स्वअभ्यासाद्वारे JEEची तयारी करू शकतो त्याला JEE परीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या बाजारपेठेत उपलब्ध असणाऱ्या पुस्तकसंपदेचा उपयोग करता येईल.

* ई-लर्निग – ऑनलाईन अथवा टॅबलेटमध्ये अथवा पेन ड्राइव्ह अशा विविध इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेली व्हिडीओ लेक्चर्स, ई-स्टडी मटेरिअल, ई-टेस्ट अशा सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी करता येईल. हा गेल्या काही वर्षांत रुजत चाललेला अभ्यासाचा नवा ट्रेंड असून देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना देशातील कुठल्याही दर्जेदार संस्थांद्वारे आणि प्रशिक्षकांद्वारे ई-लर्निगद्वारे मार्गदर्शन मिळू शकते.

JEE परीक्षा गांभीर्यपूर्वक देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने अकरावी आणि बारावीत या परीक्षेसाठी दररोज ६ ते ८ तास नेमाने अभ्यास करणे आवश्यक ठरते म्हणूनच अभियांत्रिकी शाखेला जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने अकरावी-बारावीत JEEचा अभ्यास करायला हवा आणि या दोन वर्षांच्या कालावधीत अभ्यासेतर उपक्रम कमी करावेत. JEEच्या अभ्यासाचा मार्ग तुम्हाला बरंच काही मिळवून देणारा ठरतो आणि या अभ्यासातून विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकीच्या चार वर्षांचा पाया हा अधिक मजबूत होतो. विद्यार्थ्यांकडे दोन पर्याय शिल्लक असतात- एक तर अकरावी-बारावीला मजा करून नंतर अभियांत्रिकीची चार वर्षे रडत-कण्हत काढायची किंवा अकरावी-बारावीला अत्यंत कठोर मेहनत घेऊन JEEचा अभ्यास करत अभियांत्रिकीची चार वर्षे चांगल्या गुणांनी आणि KT शिवाय उत्तीर्ण करायची. हुशार विद्यार्थी यातील अचूक पर्याय निवडतील.

टीप - ज्या विद्यार्थ्यांमध्ये उच्च प्रतीची तार्किक बुद्धिमत्ता आहे, अशाच विद्यार्थ्यांनी JEEच्या अभ्यासाकडे वळावे. हा अभ्यास साधारण क्षमतेच्या मुलांना झेपतोच असे नाही. ही गोष्ट आपल्या पाल्याला JEEच्या अभ्यासाला जुंपताना पालकांनी ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे.

Related : JEE Main Computer Based Test 2019: Frequently Asked Questions (FAQs)

 

Which Halogen reacts with caustic soda to liberate oxygen ?

For more information regarding how to prepare for JEE, NEET, MHT-CET Exams, kindly fill in your details in the following form.Default Image
Profile Image
© 2020 All rights reserved by AKP Learning Solutions Pvt Ltd